Join us

आमिरमुळे प्रियांकाच्या हातून गेला 'गजनी'; अशी झाली असीनची सिनेमात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 14:22 IST

Ghajini: या सिनेमात प्रियांकाने मुख्य भूमिका साकारावी अशी निर्मात्यांची इच्छा होती.

बॉलिवूडमध्ये विशेष गाजलेला सिनेमा म्हणजे गजनी. आमिर खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असीन यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला होता. या सिनेमामुळे असीन बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. परंतु, या सिनेमासाठी ती निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. तिच्या ऐवजी प्रियांका चोप्राची निवड करण्यात आली होती. मात्र, आमिरच्या एका निर्णयामुळे आसीनची या सिनेमात एन्ट्री झाली. 

या सिनेमात प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका साकारावी अशी निर्मात्यांची इच्छा होती. परंतु, आमिरने प्रियांकाऐवजी असीन या सिनेमात घ्यावं असं सांगितलं. गजनीच्या ओरिजनल तामिळ सिनेमात आसीन मुख्य भूमिकेत होती. या सिनेमात आसीनने केलेलं काम आमिरला प्रचंड आवडलं होतं. त्यामुळे गजनीमध्येही तिनेच लीड रोल करावा अशी त्याची इच्छा होती.  

दरम्यान, गजनीमध्ये आसीनने कल्पना ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमातील लीड रोलसाठी निर्मात्यांनी विचारणा केली त्यावेळी त्याने सलमान खानचं नाव सुचवलं होतं. परंतु, या सिनेमासाठी आमिर कसा योग्य आहे हे निर्मात्यांनी त्याला पटवून दिलं. त्यानंतर आमिर हा सिनेमा करायला तयार झाला. 

टॅग्स :बॉलिवूडअसिनआमिर खानप्रियंका चोप्रासिनेमा