ऑस्कर २०२३ (Oscar 2023) मधील 'आरआरआर'मधील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ऑरिजनल साँगचा पुरस्कार मिळाल्यानंतर रामचरण भारतात परतला आहे. दिल्ली एअरपोर्टवर पत्नी उपासनासोबत दिसला. चाहत्यांना दोघांनी घेरले. चाहत्यांनी गराडा घातलेला असतानादेखील राम चरण हसताना दिसला तर त्याची पत्नी या गर्दीतून स्वतःला वाचवताना दिसली. विमानतळाच्या बाहेर आल्यानंतर, कारच्या रुफ टॉपवरुन बाहेर येऊन अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना हात दाखवला.
एअरपोर्टवर राम चरणला घेरलंदिल्ली विमानतळावर मीडिया व्यक्तिरिक्त राम चरणचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होते. याशिवाय अनेक चाहत्यांनीही राम चरणचे विमानतळावर 'आरआरआर'चा झेंडा घेऊन स्वागत केले. 'RRR'च्या अफाट यशानंतर राम चरण पॅन इंडियाचा स्टार बनला आहे. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्येही कमालीची वाढ झाली आहे.
एक दिवसापूर्वी ज्युनियर एनटीआरनेही ऑस्कर जिंकून पुनरागमन केले होते. हैदराबाद विमानतळावरही त्याला चाहत्यांनी घेरले होते, त्यानंतर तो स्वत:ला गर्दीतून वाचवत बाहेर आला.
'RRR' चित्रपटातील 'नातू नातू' या गाण्याने ऑस्कर जिंकल्यानंतर देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे. राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि एसएस राजामौली यांचा दर्जा आता चित्रपटसृष्टीत उंचावला आहे. प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने या स्टार्सचे स्वागत केले, तेच त्यांच्या यशाचे फलित आहे.'नाटू नाटू' या गाण्यानं ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे. कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.