राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा सिनेइंडस्ट्रीतील सर्वात मोठा सन्मान आहे. आज ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारात अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाने दोन पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि
'कांतारा' हा २०२२च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. केवळ दक्षिण भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाला पसंती मिळाली होती. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा' हा चित्रपट किनारपट्टीच्या कर्नाटकातील एका गावावर आधारित आहे आणि त्या प्रदेशातील मानव-निसर्ग संघर्षात जमिनीची दैवी नृत्यांगना कशी विणली जाते हे दाखवते. देव आणि गुलिगा परंपरा या चित्रपटात मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
१९५४ सालापासून दिला जातो राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार आहे. याची सुरुवात १९५४ साली झाली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर राष्ट्रपती या पुरस्कारांचे वितरण करतात.