Join us

70th National Film Awards: 'KGF Chapter 2' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, यशच्या चित्रपटाने 'राष्ट्रीय पुरस्कारा'वर कोरलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 2:51 PM

नुकतीच ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

70th national film awards KGF chapter 2 : नुकतीच ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये  सर्वोत्कृष्ट कन्नड राष्ट्रीय पुरस्कारासाठी  'KGF Chapter 2' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटांमधून  'KGF Chapter 2' ने बाजी मारली आहे. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या 'KGF Chapter 2' चित्रपटाने २ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. दरम्यान, आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर  'KGF Chapter 2' चित्रपटाने आपली मोहर उमटवली आहे. शिवाय या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफरचा पुरस्काराही पटकावला आहे. प्रशांत नील यांनी दोन्ही कॅटेगरीमध्ये हा अवॉर्ड मिळवला आहे. 

'KGF Chapter 2' एप्रिल २०२२ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. अल्पावधीतच कन्नडस्टार यशचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. प्रेक्षकांनी अक्षरश: या चित्रपटाला डोक्यावरच घेतलं.कन्नड सुपरस्टार यशचा ‘KGF’ व ‘KGF 2’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘केजीएफ 2’ तर 2022 या वर्षातला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या सिनेमानं सुमारे 1200 कोटी कमावले. प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडला. 

KGF हा देशातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचा दुसरा भाग जगभरात तुफान चालला, पण आता याच्या पहिल्या भागाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. KGF चित्रपटाच्या दोन्ही भागांनी देश-विदेशात चांगला व्यवसाय केला. 

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारकेजीएफसिनेमा