Join us

साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेते मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 13:31 IST

अभिनेता आणि कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचं निधन झालं आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येतेय, अभिनेता आणि कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचं निधन झालं आहे. हैदराबाद येथील ज्युबली हिल्स येथील खासगी रुग्णालयात आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 82 वर्षांचे होते. मीडिया रिपोर्ट्नुसार, त्यांच्यावर हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यांना तामिळनाडूतील प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

चंद्रमोहन यांच्या निधनामुळे कुटुंबातच नव्हे, तर साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. चंद्र मोहन यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुली आहेत. ते ज्येष्ठ चित्रपट निर्माते के विश्वनाथ यांचं चुलत भाऊ होते. चंद्रमोहन यांच्या पार्थिवावर सोमवारी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितलं जातंय. साऊथच्या अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केले आहे. व्यंकटेश दग्गुबती, नानी, राम चरण आणि साई धरम तेज या स्टार्सनी ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

चंद्र मोहन यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 1966 मध्ये 'रंगुला रत्नम' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी श्रीदेवी, जयाप्रदा, जयसुधा यांसारख्या अभिनेत्रींसोबतही काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू