Join us

ऑनस्क्रीन सासूसोबत चक्क अभिनेत्याने थाटला संसार, करावा लागला ट्रोलिंगचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:21 IST

या प्रसिद्ध कपलला लग्नावरुन खूप ट्रोल करण्यात आले होते.

अभिनेता इंद्रनील (Indraneel) आणि मेघना रामी (Meghna Raami) तेलगू टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. हे दोघेही तेलुगूमधील सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिका 'चक्रवगम'चा भाग आहेत. ही मालिका २००३ मध्ये सुरू झाली होती. यामध्ये मेघनाने तिचा पती इंद्रनीलच्या सासूची भूमिका साकारली होती. या मालिकेचे १००० हून अधिक भाग प्रदर्शित झाले. कोरोना काळात 'चक्रवगम' ही मालिका पुन्हा प्रसारित झाली. त्यामुळे दोघेही पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आले. इंद्रनील वर्माच्या सासूची भूमिका करणारी अभिनेत्री त्याची पत्नी झाली हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. त्यांच्यावर टीकाही झाली.

जेव्हा इंद्रनील आणि मेघना रामी लग्न करणार होते, तेव्हा दोघांवरही टीका झाली होती. मात्र याची पर्वा न करता दोघांनीही लग्न केले. आता दोघांचे वय चाळीशीच्या टप्प्यात आहे. त्यांना अद्याप मुलंबाळ नाही. यावर त्यांनी म्हटले होते की, जर त्यांना आता मुलं झाली तर ते ६० वर्षांचे झाल्यावर त्यांच्या मुलांची काळजी कोण घेईल. म्हणूनच त्यांना मुलं नकोय. मेघनाने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की काही वर्षांपूर्वी टीव्ही सेटवर तिचे मिसकॅरेज झाले होते. मेघना रामीने सांगितले होते की, गर्भपात झाल्यामुळे ती ६ वर्षांपासून नैराश्यात होती. हे सर्व घडले तेव्हा ती तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती. त्याला खूप कठीण टप्प्यातून जावे लागले. या सगळ्यात तिचा नवरा इंद्रनीलने तिला साथ दिली.

मेघना रामीने तिच्या पतीसोबत एक एनजीओ सुरू केली. ती म्हणाली की तिला पुन्हा कधीही आई व्हायचे नाही. त्यांनी दत्तक घेण्याची कल्पनाही सोडून दिली. ती म्हणाली की, जर ती संपूर्ण जगासोबत प्रेम वाटू शकते, तर ते मुलांपुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही.