Join us  

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराजने खरेदी केली पोर्शे कार, किंमत कोटींच्या घरात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 2:12 PM

साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याने पोर्शे कार खरेदी केलीय. या कारची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल (prithviraj)

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले की अभिनेते स्वतःसाठी लक्झरी गाड्या खरेदी करतात. या गाड्यांची किंमत करोडोंच्या घरात असते. भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता पृथ्वीराजने एक आलिशान पोर्शे गाडी खरेदी केलीय. पृथ्वीराजने इन्स्टाग्रामवर नवीन गाडी घेतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. या गाडीची किंमत करोडोंच्या घरात आहे. सध्या पृथ्वीराजच्या या नवीन गाडीची चांगलीच चर्चा आहे.

पृथ्वीराजने खरेदी केली आलिशान पोर्शे

पृथ्वीराजने नवीन गाडी घेतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. गाडीवरचा पडदा बाजूला करतानाचा आणि टेस्ट ड्राईव्ह करतानाचा व्हिडीओ पृथ्वीराजने शेअर केलाय. पृथ्वीराज सुकुमारनने एक नवीन पोर्श 911 GT3 खरेदी केली आहे. पृथ्वीराजकडे दिमाखदार गाड्यांचा संग्रह आहे. पृथ्वीराजच्या गाड्यांच्या ताफ्यात पोर्शेनिमित्त आणखी एक गाडी सामाविष्ट झालीय. या कारची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. पृथ्वीराजने पोर्शे खरेदी केल्याच्या  व्हिडिओमध्ये तो आणि त्याची पत्नी सुप्रिया मेनन दोघेही आनंदात दिसतात.

पृथ्वीराजचं वर्कफ्रंट

पृथ्वीराजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो अलीकडेच अक्षय कुमारसोबत 'बडे मिया छोटे मिया' सिनेमात दिसला. या सिनेमात पृथ्वीराजने खलनायकाची भूमिका साकारली होती. सिनेमा जरी फ्लॉप झाला असला तरीही पृथ्वीराजच्या कामाचं खूप कौतुक झालंय. याशिवाय पृथ्वीराजच्या 'द गोट लाईफ' हा सिनेमाही खूप गाजला. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत होता. आर्थिक सुबत्ता यावी म्हणून आखाती देशात अडकलेल्या नजीब या तरुणाची कहाणी या सिनेमात पाहायला मिळाली.  

टॅग्स :Tollywoodपोर्शेकार