अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा २: द रुल' ने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. साऊथपेक्षा हिंदीमध्येच सिनेमाने जास्त कमाई केली आहे. 'पुष्पा'मुळे इतर सिनेमे मागे पडलेत. यामुळे दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने 'पैसा बोलता है' म्हणत सिस्टीमविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही सिद्धार्थने (Siddharth 'पुष्पा' ला घाबरत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्याचा 'मिस यू' सिनेमा 'पुष्पा'सोबतच रिलीज होणार होता. मात्र नंतर सिद्धार्थने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली.
'गलाटा प्लस'वर झालेल्या राऊंडटेबलमध्ये निर्माते आणि कलाकारांनी हजेरी लावलीहोती. यावेळी 'पुष्पा २' मुळे इतर सिनेमांना स्क्रीन मिळत नाहीत यावरुन चांदनी साशा आणि सिद्धार्थने आपलं मत व्यक्त केलं. सिद्धार्थ म्हणाला, "प्रत्येक जण देवाला भेटण्यासाठी मंदिरात जातो. या इंडस्ट्रीत आम्ही प्रेक्षकांनाच देव मानतो. काही लोकांना रांगेत उभं राहून अगदी पाच सेकंदच देवाचं दर्शन घडतं. तोच काही व्हिआयपी तिकीट वाले बराच वेळ देवासमोर उभे राहतात. आता कोणाची प्रार्थना महत्वाची आहे आणि कोणती चांगली आहे? हा भेदभाव योग्य आहे का?"
तो पुढे म्हणाला, "निर्मात्यांचाही असाच प्रयत्न असतो. माझ्याकडे व्हीआयपी तिकीट नाही याचा अर्थ मला देवाला भेटण्याची परवानगी नाही. याचप्रमाणे जर सिनेमागृहात केवळ एक सिनेमा चालतो याचा अर्थ पॉवरच सगळं काही आहे. मग प्रश्न पडतो की 'सिस्टीम निष्पक्ष आहे?' पैसा बोलतो."
फिल्म मार्केटिंगच्या चांदनी साशाने 'पुष्पा २'च्या यशामागे मार्केटिंगच असल्याचं सांगितलं. मेकर्सने मार्केटिंगवर बराच खर्च केला आहे. त्यांच्याकडे असलेले डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म, संपूर्ण भारतात प्रत्येक स्क्रीन आणि शोवर 'पुष्पा'च दाखवत आहेत. आता आपण स्वत:लाच प्रश्न विचारला पाहिजे की 'हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे?'