गेल्या काही महिन्यांमध्ये 'महाराजा' (maharaja movie) सिनेमातून प्रेक्षकांची पसंती मिळवलेला साउथ सुपरस्टार म्हणजे विजय सेतुपती. (vijay sethupati) विजयने आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करत लोकांचं प्रेम मिळवलं आहे. विजय कलाकार म्हणून ग्रेट आहेच पण माणून म्हणूनही तो किती संवेदनशील आहे याचा अनुभव नुकताच सर्वांना आलाय. विजयने सिने कामगारांच्या घरांसाठी १ कोटी दान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विजयचं कौतुक होतंय. विजयने दान केले १ कोटी कारण...
सुप्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीने साउथ इंडियन मूवी वर्कर्स युनियनमधील सदस्यांसाठी १ कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयच्या पैशांमधून सिने कामगारांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत. विजयने चेन्नईमधील फिल्म एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ साउथ इंडियाला (FEFSI) यासाठी मदत केली. सिनेमाच्या पडद्यामागील तंत्रज्ञ आणि कामगारांना राहण्यासाठी चांगली घरं निर्माण करण्यात यावी, म्हणून ही संस्था काम करते. विजयने या संस्थेला १ कोटींची मोलाची मदत केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार विजयने एका अपार्टमेंट कॉम्लेक्सच्या निर्माणासाठी १.३० कोटी रुपये दान केले आहेत. या कॉम्पेक्सला विजयच्या सन्मानार्थ 'विजय सेतुपति टॉवर्स' हे नाव देण्यात येणार आहे. FEFSI ही संस्था तामिळ फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील विविध भागांमधील २५ युनियनमधील २५००० कामगार आणि तंत्रज्ञांचं प्रतिनिधित्व करते. विजयच्या मदतीमुळे पडद्यामागे अहोरात्र राबणाऱ्या कामगारांना हक्काचं घर मिळणार आहे.