Join us  

सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने जुळ्या मुलांसोबत रिक्रिएट केली 'बाहुबली' पोज, खास फोटोशूट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:37 AM

मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने बाहुबली मधली गाजलेली पोज रिक्रिएट करुन खास फोटोशूट केलंय (bahubali)

'बाहुबली' सिनेमा माहित नाही असा एकही माणूस सापडणार नाही. भारतीय मनोरंजन विश्वाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या 'बाहुबली' सिनेमाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. 'बाहुबली' सिनेमातले संवाद, सीन्स, गाणी, अभिनय अशा सर्वच गोष्टी प्रचंड गाजल्या. 'बाहुबली' सिनेमामधील अनेक प्रसंग गाजले. त्यापैकी एक म्हणजे शिवगामी देवी जेव्हा नदीत पडतात तेव्हा त्या हात वर करुन महेंद्र बाहुबलीला वाचवतात. हाच सीन 'जवान' फेम अभिनेत्री नयनताराच्या पतीने रिक्रिएट केलाय.

नयनताराच्या पतीने रिक्रिएट केला बाहुबली सीन

काल झालेला फादर्स डे विघ्नेश शिवन आणि नयनतारा यांच्यासाठी खास होता. नयनतारा आणि तिच्या पतीने त्यांच्या जुळ्या मुलांसोबत खास वेळ घालवला. नयनताराच्या मुलांची नावं आहेत उईर आणि उलाग. नयनताराचा पती आणि चित्रपट निर्माता विघ्नेश सिवनने जुळ्या मुलांसोबत आयकॉनिक बाहुबली पोज पुन्हा रिक्रिएट केली. नयनताराने तिच्या इंस्टाग्राम पेजवर हार्ट इमोजीसह दोन फोटो शेअर केले आहेत. यात विघ्नेश पाण्याखाली असून त्याच्या हातात त्याची मुलं आहेत. याशिवाय नयनताराने विघ्नेशला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

नयनताराच्या पतीचा खास फोटो व्हायरल

नयनताराचा पती विघ्नेश शिवनने कॅप्शनसह फोटो शेअर केले, "माय डिअर बाहुबली १ आणि २. आजचा दिवस तुमच्यामुळे खास आहे. तुम्हा मुलांसोबत माझं आयुष्य खूपच समाधानकारक आहे. लव्ह यू माय उयिर आणि उलग." या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव नयनतारा आणि विघ्नेशच्या चाहत्यांनी केलाय. नयनतारा गेल्या वर्षी शाहरुख खानसोबत 'जवान' सिनेमात दिसली. काही महिन्यांपुर्वी नयनताराचा 'अन्नपूर्णानी' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. पुढे हा सिनेमा नेटफ्लिक्सवरुन हटवला गेला.

टॅग्स :बाहुबलीनयनतारामराठीTollywood