Join us

रक्तबंबाळ चेहरा अन्; 'ओडेला-२' सिनेमातील तमन्ना भाटियाचा लूक चर्चेत; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 12:20 IST

बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia : बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती लाईमलाइटमध्ये येते. अशातच सध्या तमन्ना तिचा आगामी चित्रपट 'ओडेला २' मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. 'ओडेला २' हा सिनेमा २०२१ मध्ये आलेल्या 'ओडेला रेल्वे स्टेशन' या सिनेमाचा सीक्वेल आहे. अशोक तेजा दिग्दर्शित हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता या चित्रपटाचा सीक्वल लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'ओडेला-२' च्या रिलीज डेटबद्दल खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे सिनेरसिकांना सीक्वेलची उत्सुकता लागली आहे.

अलिकडेच सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'ओडेला-२' चं नवीन पोस्टर रिलीज केलं. त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली आहे. तमन्ना भाटिया स्टारर हा चित्रपट १७ एप्रिल रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशोक तेजा दिग्दर्शित हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये तमन्ना एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अॅक्शन सीक्वेन्स असणार आहेत. दरम्यान, या पोस्टरमध्ये तमन्नाच्या चेहऱ्यावर खोल जखमा आणि रक्ताचे डाग आहेत. यासोबतच तिचा लूकही खूपच गंभीर दिसत आहे. त्याचबरोबरच पोस्टरमध्ये बॅकग्राउंडला वाराणसी हे शहरही दाखवण्यात आलं आहे. 

अशोक तेजा दिग्दर्शित 'ओडेला-२' ची निर्मिती डी मधू यांनी केली आहे. चित्रपटामध्ये तमन्ना भाटियासह हेबा पटेल आणि वशिष्ठ एन सिम्हा मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :तमन्ना भाटियाTollywoodसिनेमा