Join us

लग्न झालंच नाही? आदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबत फोटो शेअर करत उलगडलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:28 IST

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी लग्न केल्याची चर्चा काल दिवसभर रंगली.

अभिनेत्री आदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) दाक्षिणात्य अभिनेता बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत (Siddharth) गुपचूप लग्न केल्याची चर्चा काल रंगली होती. दोघंही गेल्या काही वर्षांपासून डेट करत आहेत. काल संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजच्या रिलीज डेट लाँचलाही ती गैरहजर होती. इव्हेंटच्या होस्टनेही स्वत:च ती का नाही आली याचं कारण सांगत तिचं लग्न झाल्याचा खुलासा केला. पण आता आदितीने स्वत: पोस्ट शेअर करत वेगळीच माहिती दिली आहे.

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. आता आदितीने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. तिने सिद्धार्थ सोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. यामध्ये दोघंही रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 'HE SAIS YES, ENGAGED' असं कॅप्शन तिने दिलं आहे. आदितीने घातलेली हिऱ्याची अंगठी खूपच सुंदर असून चाहत्यांचं त्याकडेच लक्ष गेलं. अखेर दोघांचा साखरपुडा झाल्याचं समोर आलं. मात्र अद्याप लग्न झालेलं नाही. हे लव्हबर्ड्स कधी लग्न करताएत याची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

आदिती आणि सिद्धार्थने इंटिमेट सेरेमनीमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला. हा एकच फोटो आदितीने शेअर केला असून त्यांच्या एंगेजमेंटला नक्की कोण कोण उपस्थित होतं याविषयी काहीच स्पष्ट नाही. तसंच ते कोणत्या तारखेला लग्नबंधनात अडकतात हेही अद्याप दोघांनी सांगितलेलं नाही.

आदिती राव हैदरी संजय लीला भन्साळींच्या आगामी 'हीरामंडी: द डायमंड बाजार' वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. १ मे रोजी सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. आ

टॅग्स :आदिती राव हैदरीTollywoodलग्नसेलिब्रिटी