Join us

"दिवसाची सुरुवातच रडण्याने...", आदितीच्या 'या' सवयींचा सिद्धार्थला होतो त्रास!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 2:28 PM

नुकतंच आदिती आणि सिद्धार्थ यांनी vogueindia या प्रसिद्ध मासिकाला मुलाखत दिली.

अभिनेत्री आदिती राव हैदरीने 16 सप्टेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थसोबत दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं. साऊथमधील 400 वर्ष जुन्या मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली. आदितीने फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. त्याच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतंच एका मुलाखतीमध्ये आदिती आणि सिद्धार्थने एकमेंकाबाबतच्या काही गोष्टींचा खुलासा केला. 

नुकतंच आदिती आणि सिद्धार्थ यांनी vogueindia या प्रसिद्ध मासिकाला मुलाखत दिली. यावेळी मुलाखातीदरम्यान आदिती रोज सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट काय करते? हा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "ती सकाळी मला जबरदस्तीने उठवते.  अनेकदा मला सकाळी लवकर उठल्यामुळे रडावासं वाटतं". यावर आदिती हसत म्हणाली, "सूर्योदय झाल्यावर उठलंच पाहिजे". यासोबत सिद्धार्थने दोघांमध्ये सर्वात जास्त सॉरी तोच म्हणतो, याचाही खुलासा केला.  तो म्हणाला, " माझ्याकडून प्रत्येक पाच मिनिटाला खूप चुका होतात. मी तिच्याशी बोलतो तेव्हा त्यात 90 टक्के सॉरी आणि 10 टक्के thank you म्हणत असतो".

याशिवाय, तुमच्यामध्ये सर्वांत पहिल्यांदा i love you कोणी म्हटलं होतं, असा प्रश्न करण्यात आला. यावर सिद्धार्थ म्हणाला, "मी पहिल्यांदा तिला  i love you म्हटलं होतं". आदिती आणि सिद्धार्थ  यांनी काही वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर लग्न केलं आहे. दोघांची पहिली भेट ही  2021 मध्ये तेलगू सिनेमा 'समुद्रम'च्या सेटवर झाली होती. यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघेही एकमेकांना डेट करु लागले. सुरुवातीला या दोघांनीही त्याचं नातं गुप्त ठेवलं असलं तरीही नंतर मात्र त्यांनी अधिकृतपणे नात्याचा जाहीर खुलासा केला. आदितीचं हे दुसरं लग्न असून तिने याआधी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 4 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 

 

टॅग्स :आदिती राव हैदरीसेलिब्रिटीलग्न