अभिनेत्री समांथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu)चे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीचे लग्न नागा चैतन्य(Naga Chaitanya)शी झाले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपाला(Shobhita Dhulipala)सोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता सामंथा रुथ प्रभूच्या लव्ह लाईफबद्दलही बातम्या येत आहेत. अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली असल्याचे बोलले जात आहे.
रेडिटवरील वृत्तानुसार, समांथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची चर्चा आहे. ते एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या बातम्या येत आहेत. समांथा आणि राज वेब शोमध्ये एकत्र काम करत आहेत. समांथाने राजच्या शो द फॅमिली मॅन २ मधून ओटीटी पदार्पण केले आणि आता ती त्याच्या सिटाडेल सीरिजमध्ये दिसणार आहे.
समांथा करतेय दिग्दर्शकाला डेट?
द फॅमिली मॅन २ मध्ये समांथाचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. अभिनेत्री ॲक्शन करताना दिसली होती. आता चाहत्यांना तिचा आगामी सीरिज सिटाडेलबद्दल खूप उत्सुकता आहे. सध्या समांथा दिग्दर्शक राजला डेट करत असल्याचे बोलले जात असले तरी या संदर्भात समांथा आणि राज यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
२०२१मध्ये समांथा आणि नागा चैतन्य झाले वेगळे
समांथा आणि नागा चैतन्यबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर २०२१ मध्ये हे जोडपे वेगळे झाले. ते वेगळे झाल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. यानंतर समांथा चांगलीच तुटली होती. २०२२ मध्ये तिने सांगितले की ती मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. तेव्हापासून अभिनेत्रीने स्वत:ला मजबूत ठेवले आहे. काही काळ कामातून ब्रेकही घेतला. आता ती पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
सिटाडेलबद्दल
सिटाडेलबद्दल सांगायचे तर समांथासोबत या सीरिजमध्ये अभिनेता वरुण धवनही यात दिसणार आहे. या शोचा टीझरही रिलीज झाला आहे. हा टीझर चाहत्यांना खूप आवडला.