सलमान खाननंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 04:04 PM2024-12-10T16:04:14+5:302024-12-10T16:07:37+5:30
सलमान खाननंतर आणखी एका सुपरस्टार अभिनेत्यासा धमकीचा फोन आलाय
गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याला धमकी मिळाली आहे. हा अभिनेता म्हणजे पवन कल्याण. साउथ सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री अशी ओळख असलेले अभिनेते पवन कल्याण यांना धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात माणसाने शिवीगाळ करत पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. पोलिसांनी या प्रकरणात केस दाखल केलीय.
पवन कल्याण यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी
सोमवारी पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांना धमकी देणाऱ्या एका अज्ञात माणसाचा फोन आला. त्यामुळे सध्यातरी पोलिसांना या अज्ञात व्यक्तीची ओळख पटली नाहीये. पवन कल्याण यांचा राजकीय पक्ष जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवर याविषयी माहिती देण्यात आलीय. यात सांगण्यात आलंय की, "मोबाईलवर धमकीवजा फोन आला. यामध्ये वाईट भाषेचा वापर करण्यात आला आणि अनेक मॅसेज होते. याविषयी पोलिसांना कळवण्यात आलंय."
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर या घटनेच्या सखोल तपासणीला सुरुवात होत आहे. अजूनतरी पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या माणसाबद्दल काही कळलं नाही. याशिवाय कोणत्या उद्दिष्टाने या व्यक्तीने पवन कल्याण यांना फोन केला याचाही पोलीस शोध घेत आहेत. पवन कल्याण सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असून राजकीय कारकीर्दीकडे लक्ष देत आहेत. सध्या ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत.