सुपरस्टार प्रभासने का घेतला चित्रपटांतून ब्रेक; खरं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 08:55 AM2024-01-31T08:55:16+5:302024-01-31T09:00:37+5:30

सुपरस्टार प्रभासने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

After success of Salaar, Prabhas to take break from acting due to THIS reason | सुपरस्टार प्रभासने का घेतला चित्रपटांतून ब्रेक; खरं कारण आलं समोर

सुपरस्टार प्रभासने का घेतला चित्रपटांतून ब्रेक; खरं कारण आलं समोर

भारतातील आजच्या घाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास. दक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आज त्याने जगभरात त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते खूप आतुरतेने वाट पाहतात.  प्रभास हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. 'बाहुबली 2' च्या यशानंतर सहा वर्षांनी प्रभासने 'सालार पार्ट 1' हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. यातच चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे.

ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासनं अभिनयापासून ब्रेक घेतला आहे.  'सालार'च्या यशानंतर प्रभासने इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानं अभियनातून ब्रेक घेण्यामागचं कारण समोर आलं आहे. प्रभासनं विश्रांती घेण्यासाठी थोड्या काळासाठी हा ब्रेक घेतला आहे. आयुष्यातील काही गोष्टींवर तो लक्ष क्रेंदीत करणार आहे. ब्रेकनंतर मार्चमध्ये प्रभास पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. आता तो अवघ्या महिनाभराच्या ब्रेकवर आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासवर एक शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी तो युरोपला जाऊ शकतो. कारण तो एका दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. तर प्रभासकडे अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आहेत. अभिनेता नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' 9 मे 2024 रोजी प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत असतील. याशिवाय प्रभासकडे 'स्पिरिट' आणि 'द राजसाहेब' हे सिनेमेदेखील आहेत.

Web Title: After success of Salaar, Prabhas to take break from acting due to THIS reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.