Join us

'पुष्पा २'ची रिलीज डेट समोर आल्यानंतर तिसऱ्या भागाची घोषणा, 'पुष्पा ३' संदर्भात निर्माते म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 19:10 IST

Pushpa 3 : एकीकडे जिथे चाहते अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तिथे 'पुष्पा ३'बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

एकीकडे जिथे चाहते अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या 'पुष्पा २'(Pushpa 2)च्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तिथे 'पुष्पा ३'बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. पुष्पा २ सिनेमा ५ डिसेंबरला रिलीज होत आहे आणि त्याचे प्रमोशनदेखील सुरू झाले आहे. दरम्यान आता निर्माते रवी शंकर यांनी 'पुष्पा ३' (Pushpa 3) संदर्भात हिंट दिली आहे. तसेच पुष्पा २च्या यशावर सगळं अवलंबून असल्याचं म्हटलं आहे.

पुष्पा २ रिलीज होण्यासाठी फक्त ५० दिवस बाकी आहे. निर्मात्यांनी प्रमोशन करायला सुरूवात केली आहे. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, २४ ऑक्टोबर रवि शंकरने हैदराबादमध्ये एक पत्रकार परिषदेत पुष्पा ३ वर अपडेट दिली.  पुष्पा ३बद्दल रवि शंकर म्हणाले की, जर प्रेक्षक पुष्पा २ला सपोर्ट करतील आणि सुपरहिट बनवतील तर नक्कीच आम्ही तिसरा भाग बनवण्याचा विचार करू. त्यांनी पुढे म्हटले की, तिसरा भाग म्हणजेच पुष्पा ३साठी आधीपासून एक सॉलिड लीड त्यांच्याकडे आहे, जिथे कथेला सुरूवात होऊ शकते.

पुष्पा ३बद्दल अल्लू अर्जुन म्हणाला...रवि शंकर म्हणाले की, पुन्हा कन्फर्म केले की पुष्पा ३वर काम चालले आहे. काही महिन्यांपूर्वी अल्लू अर्जुनदेखील बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुष्पा ३ येणार असल्याची पुष्टी केली होती. त्याने व्हरायटीशी बोलताना इच्छा व्यक्त केली होती की, पुष्पाची एक फ्रंचाइजी बनवायची होती. प्रेक्षक तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करू शकतात आणि त्याच्याकडे चांगली कल्पनादेखील आहे.   

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा