Join us

प्रसिद्ध अभिनेत्याची झाली ब्रेन सर्जरी? मॅनेजरने दिले हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 16:03 IST

Ajith kumar: अजित कुमार याला चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अजित कुमार (ajith kumar) याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तामिळ इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या अजित कुमार याची प्रकृती खालावली असून नुकतीच त्याची ब्रेन सर्जरी झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. यामध्येच त्याच्या मॅनेजरने आता त्याचे हेल्थ अपडेट दिले आहेत.

अलिकडेच सोशल मीडियावर अजित कुमारविषयी एक माहिती व्हायरल झाली होती. त्यानुसार, चेन्नईतील अपोलो रुग्णालयात अजित कुमारला दाखल करण्यात आलं असून त्याची मोठी ब्रेन सर्जरी पार पडल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं त्याच्या मॅनेजरने म्हटलं आहे.

"अजित कुमार यांचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, ही माहिती खोटी आहे. अजित कुमार यांचं कोणतंही ऑपरेशन झालं नसून ते नियमित चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. चेकअप दरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या कानाखालील नसा कमकूवत झाल्याचं सांगितलं. त्यानंतर अर्धा तास त्यांच्यावर उपचार करण्यात आले," असं अजित कुमार यांच्या मॅनेजरने सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "अजित कुमार यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल."

दरम्यान, अजित कुमार सध्या 'विदा मुयारची' या सिनेमाचं शुटिंग करत आहेत. मात्र, सिनेमाचं चित्रीकरण अर्ध्यावर थांबवून त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे चाहते चिंतेत होते.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसिनेमाआरोग्य