Join us

बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:57 IST

अल्लू अर्जुन सर्वात जास्त मानधन घेणारा भारतीय कलाकार बनला आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun)  'पुष्पा 2' (Pushpa 2) मधून धमाका करणार आहे. सध्या पुष्पाचा सगळीकडेच माहोल बनत चालला आहे. प्रेक्षक सिनेमाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत  आहेत. ५ डिसेंबरला 'पुष्पा २' प्रदर्शित होणार आहे. लवकरच सिनेमाचा ट्रेलर भेटीला येईल. ५०० कोटी बजेटमध्ये बनलेल्या सिनेमासाठी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाने किती मानधन घेतलं माहितीये का?

अल्लू अर्जुन सर्वात जास्त मानधन घेणारा भारतीय कलाकार बनला आहे. याआधी थलपति विजय असा अभिनेता होता जो जास्त फी घ्यायचा. आगामी 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने १००-२०० नाही तर तब्बल ३०० कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. त्याच्या तुलनेत फहाद फाजिल आणि रश्मिका मंदाना यांना मात्र अगदीच कमी माधन मिळालं आहे. 

M9 डॉट कॉम रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन सर्वात जास्त म्हणजेच ३०० कोटी मानधन घेणारा भारतीय अभिनेता आहे. तर दुसरीकडे सिनेमाची मुख्य नायिका रश्मिका मंदानाला केवळ १० कोटी रुपये मिळाले आहेत. तर खलनायक फहाद फाजिलला फक्त ८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. १० कोटी घेणारी रश्मिका ए लिस्ट अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे. तिने दीपिका, आलिया यांनाही मागे टाकलं आहे. मात्र अभिनेता आणि अभिनेत्रींच्या मानधनात खूप मोठी तफावत दिसून येते. 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदानाTollywood