क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (david warner) भारतीय सिनेमांचा किती वेडा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. अनेकदा डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या मैदानात 'पुष्पा' स्टाईल करताना दिसला. याशिवाय काही महिन्यांपूर्वी डेव्हिड आणि राजामौली एका जाहिरातीत एकत्र दिसले. आता डेव्हिड वॉर्नरला थेट भारतीय सिनेमात अभिनय करण्याची लॉटरी लागली आहे. याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. डेव्हिड वॉर्नर कोणत्या सिनेमात दिसणार?
डेव्हिड वॉर्नर झळकणार या सिनेमातमीडिया रिपोर्टनुसार आगामी साऊथ सिनेमात डेव्हिड वॉर्नर एका खास भूमिकेत दिसणार आहे. 'रॉबिनहुड' असं या सिनेमाचं नाव असून हा सिनेमा एक कॉमेडी एंटरटेनर असणार आहे. 'रॉबिनहुड' सिनेमाचे निर्माते रवि शंकर यांनी एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये या बातमीला पुष्टी देऊन अधिकृत घोषणा केली. वेंकी कुदुमुला दिग्दर्शित 'रॉबिनहुड' सिनेमात डेव्हिड वॉर्नर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार या सिनेमाच्या शूटिंगसाठी प्रतीदिन १ कोटी रुपयांची ऑफर वॉर्नरला देण्यात आली होती.'रॉबिनहुड' सिनेमाविषयी'रॉबिनहुड' सिनेमाविषयी सांगायचं तर या सिनेमात साऊथ सुपरस्टार नितिन प्रमुख भूमिकेत आहे. नितिनसोबत अभिनेत्री श्रीलीला सिनेमात हिरोईन म्हणून दिसणार आहे. हा सिनेमा २८ मार्च २०२५ ला रिलीज होणार आहे. माइथ्री मूवी मेकर्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात आधी रश्मिका मंदाना झळकणार होती. परंतु तिच्याजागी श्रीलीलाची वर्णी लागली आहे. आता सिनेमात डेव्हिड वॉर्नरचा अभिनय पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे.