Join us

'बाहुबली'च्या देवसेनाला झाला दुर्मिळ आजार, खुद्द अनुष्कानेच केला खुलासा; चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 09:32 IST

'बाहुबली' (Bahubali) सिनेमात देवसेनाची भूमिका साकारून जगभरात आपली अमिट छाप सोडणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. याचा खुलासा खुद्द तिनेच एका मुलाखतीत केला आहे.

'बाहुबली' (Bahubali) सिनेमात देवसेनाची भूमिका साकारून जगभरात आपली अमिट छाप सोडणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. याचा खुलासा खुद्द तिनेच एका मुलाखतीत केला आहे. त्यानुसार तिला हसण्याचा विकार आहे. ४२ वर्षीय अभिनेत्रीच्या या खुलाशामुळे चाहते चिंतेत आहेत, तर हसण्याचा आजार काय असू शकतो असा प्रश्नही लोकांना पडला आहे. पण अनुष्का ज्या आजाराबद्दल बोलत आहे त्याला वैद्यकीय भाषेत स्यूडोबुलबार इफेक्ट (पीबीए) म्हणतात. यामुळे, अनियंत्रित हसणे किंवा रडणे अचानक सुरू होते, जे सामान्य हसण्या किंवा रडण्यापेक्षा वेगळे आहे.

अनुष्का शेट्टीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. इंडिया टुडेला दिलेल्या या मुलाखतीत ती तिच्या आजाराबद्दल सांगत आहे. ती म्हणाली की, "मला हसण्याचा विकार आहे. तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की हसणे ही समस्या आहे का? माझ्यासाठी, जर मी हसायला लागले, तर मी १५-२० मिनिटे थांबू शकत नाही. जेव्हा मी एखादा कॉमेडी सीन पाहते किंवा शूट करते तेव्हा मी खरोखरच हसत हसत जमिनीवर लोळते आणि कधीकधी शूट थांबवावे लागते."

अभिनेत्रीच्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्यावर होतोय परिणाम अनुष्काच्या म्हणण्यानुसार, या दुर्मिळ आजारामुळे केवळ तिचे व्यावसायिक जीवनच विस्कळीत होत नाही, तर तिला वैयक्तिक संवादातही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. अनुष्का सांगते की, हसण्याची ही प्रक्रिया काही क्षण टिकत नाही, परंतु दीर्घकाळ चालू राहते आणि ती खूप गंभीर असू शकते. ती म्हणते की काहीवेळा हसणे इतके वेळ चालते की ते 20 मिनिटांपर्यंत चालते. हे अनियंत्रित हास्य शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकवणारे असू शकते.

आगामी प्रोजेक्टअनुष्का शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती शेवटची २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' मध्ये दिसली होती. 'घाटी' (तेलुगु) आणि 'कथानर: द वाइल्ड सॉर्सर' (मल्याळम) हे तिचे आगामी चित्रपट आहेत, जे सध्या निर्मितीच्या टप्प्यात आहेत.

टॅग्स :अनुष्का शेट्टीबाहुबली