Join us

Drishyam: मोहनलाल अन् अजय देवगण 'दृश्यम 3' चित्रपटात एकत्र दिसणार का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:00 IST

'दृश्यम' ही सर्वात लोकप्रिय सस्पेन्स-थ्रिलर फ्रँचायझी आहे.

Drishyam: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल सध्या चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचा  'बरोज थ्रीडी' हा सिनेमा 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला. हा एक फँटसी थ्रिलर सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. मोहनलाल सध्या 'बरोज थ्रीडी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच एका कार्यक्रमात त्यांनी 'दृश्यम ३'बद्दल भाष्य केलं. 

'इंडिया टुडे डिजिटल'शी बोलताना मोहनलाल यांनी भविष्यात अभिनेता अजय देवगणसोबत 'दृश्यम'मध्ये क्रॉसओव्हर करणार की नाही याबद्दल खुलासा केला. 'दृश्यम 3'मध्ये अजय देवगणसोबतच्या क्रॉसओव्हरबद्दल बोलताना मोहनलाल म्हणाले, "माझ्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नाही. हा चित्रपट प्रक्रियेत आहे. चांगला सिक्वेल बनवणे तितके सोपे नाही. हे एक मोठे आव्हान आहे. हे सर्वांसाठी आव्हानात्मक आहे, पण एक दिवस हा चित्रपट तयार होईल, यासाठी मी प्रार्थना करत आहे".

2013 मध्ये दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचा 'दृश्यम' हा क्राईम थ्रिलर मल्याळम चित्रपट रिलीज झाला. सुपरस्टार मोहनलाल यांनी मुख्य भुमिका साकारली होती.  या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर या चित्रपटाचा रिमेक कन्नड, तामिळ, तेलुगु आणि हिंदी या भाषांमध्ये  करण्यात आला. 'दृश्यम' चित्रपटाच्या यशानंतर 'दृश्यम 2' ची निर्मिती करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला.  2021 मध्ये 'दृश्यम 2' रिलीज झाला. 'दृश्यम' चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अजय देवगणनं प्रमुख भूमिका साकारली.   

टॅग्स :सिनेमाअजय देवगणसेलिब्रिटी