Daaku Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. सध्या उर्वशी तिच्या डाकू महाराज या तेलुगू सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. साउथ स्टार नंदकुमारी बाळकृष्ण यांच्यासोबत या चित्रपटात तिने स्क्रीन शेअर केली आहे. १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. पोंगलच्या शुभमुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. शिवाय यातील 'डबिडी डिबिडी' हे गाणं सुद्धा हिट झालं. आता बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर डाकू महाराज सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'डाकू महाराज' ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. येत्या ९ फेब्रुवारीला 'डाकू महाराज' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. हा चित्रपट तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, आतापर्यंत नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, चाहत्यांना याबाबत कळताच 'डाकू महाराज'च्या ओटीटी रिलीजची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
'डाकू महाराज'मध्ये नंदामुरी बालकृष्ण, बॉबी देओल, प्रज्ञा जैस्वाल, उर्वशी रौतेला आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन बॉबी कोल्ली यांनी केलं आहे. तर निर्मिती साई सौजन्या आणि नागा वामसी यांनी केली आहे.