Join us  

अल्लू अर्जुन अडचणीत, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 1:39 PM

येत्या 13 मे रोजी या भागात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

सध्या देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचाराच्या कलाकारही मैदानात उतरत आहेत. यातच आता दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) देखील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिसला.  यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा- सुव्यवस्था आणि वाहतूक समस्या निर्माण झाल्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. यामुळे अभिनेत्यावर आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 येत्या 13 मे रोजी या भागात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.  प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी यांनी रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या घरी जाऊन पाठिंबा दर्शवला. यावेळी अल्लू अर्जूनची एक झलक पाहण्याची लाखो लोकांनी झुंबड उडाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने YSRCP उमेदवार रवी चंद्र किशोर रेड्डी यांच्या घरी जाण्यापूर्वी मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरला माहिती दिली नाही. त्यामुळे त्याच्यावर आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 दरम्यान लोकसभेच्या प्रचारात अल्लू अर्जुन उतरल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू आहे. परवानगीशिवाय गर्दी जमवण्यास परवानगी नाही. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन हा कायद्याचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि सुरक्षित स्थळी नेले. 

अल्लू अर्जुन फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय. प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश होतो. 'पुष्पा' या गाजलेल्या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांनाही प्रभावित केलं. अल्लू अर्जुने पडद्यावर रंगवलेली बहुतांश पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून अल्लू अर्जुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  एकेकाळी 3 हजारात काम करणारा अल्लू अर्जुन आता कोट्यधीश आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीTollywoodराजकारणपोलिस