Join us

Video: मिचाँग चक्रीवादळाचा रजनीकांत यांना फटका; चेन्नईतील घरात शिरलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 13:41 IST

Rajinikanth: सोशल मीडियावर सध्या रजनीकांत यांच्या बंगल्याबाहेरील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिचाँग चक्रीवादळाने (michaung cyclone) सध्या देशाच्या दक्षिणेकडील राज्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोबत चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथे वित्तहानी आणि जीवितहानीदेखील झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्येच आता या पुराचा तडाखा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनाही बसल्याचं समोर आलं आहे. रजनीकांत (Rajinikanth) यांच्या चेन्नईच्या बंगल्यात पुराचं पाणी शिरलं आहे.

चेन्नईमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये पाणी शिरलं आहे. इतकंच नाही तर अनेक लोकांची घर या पूरात वाहून गेली आहेत. यामध्येच चेन्नईतील पोएस गार्डन या पॉश भागात असलेल्या रजनीकांत यांच्या बंगल्यातही पाणी शिरलं आहे. त्यांच्या बंगल्याबाहेरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रजनीकांत आणि कुटुंबीय सुरक्षित

रजनीकांत यांच्या बंगल्यात जरी पाणी शिरलं असलं तरीदेखील अभिनेता आणि त्याचे कुटुंबीय सुरक्षित आहेत. हे चक्रीवादळ येण्यापूर्वीच रजनीकांत त्यांच्या कुटुंबियांसह दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी शिफ्ट झाल्यांच सांगण्यात येत आहे. दरम्यान, रजनीकांत सध्या चेन्नईच्या बाहेर आहेत. ते सध्या Tirunelveli येथे असून त्यांच्या Thalaivar 170 या सिनेमाचं शुटिंग करत आहेत.

टॅग्स :रजनीकांतचेन्नईTollywoodचक्रीवादळपाऊस