Join us

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले 'देवरा'चे हक्क; 20 दिवस झाली अंडरवॉटर शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 20:04 IST

ज्युनियर NTR, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

साऊथचे सिनेमे आणि स्टार्स बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहेत.  अनेक दाक्षिणात्य अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये जलवा कायम आहे. बॉलिवूड स्टार्स साऊथच्या चित्रपटांमध्येही नशिब आजमावत आहेत. आदिपुरुषनंतर सैफ अली खान हा साऊथ चित्रपट 'देवरा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

ज्युनियर NTR, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.  मनोबाला विजयबालन यांनी सांगितले की, ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्या देवारा चित्रपटाचे थिएटरीयल स्ट्रीमिंग अधिकार नेटफ्लिक्सला विकले गेले आहेत. देवरा टीमने आतापर्यंत 70 टक्के अॅक्शन सीक्वेन्स पूर्ण केले आहेत. यात अंडरवॉटर शूटिंगही झालं आहे. 

'देवरा' 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे.  विशेष म्हणजे जान्हवी पहिल्यांदाच सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआरसोबत अभिनय करताना दिसणार आहे. चित्रपटाशी संबंधित या तिन्ही कलाकारांचे लूकही समोर आले आहेत. 

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडTollywood