Join us

धनुषचा 'इडली कडाई' चित्रपट येतोय, कधी होणार रिलीज? नवीन पोस्टर आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:27 IST

धनुषचा 'इडली कडाई' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एकापेक्षा एक सरस सिनेमे देत आहे. गेल्या काही वर्षांत साऊथचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. प्रेक्षकांच्या नजरा नवीन वर्षावर म्हणजेच २०२५ या वर्षावर खिळल्या आहेत.  वर्ष २०२५ मध्येही दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचे दिसत आहे.  आता सुपरस्टार धनुषच्या नव्या सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे.  चाहते धनुषवर प्रेमाचा वर्षाव करत चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

​धनुषने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. 'इडली कडई' हा चित्रपट आता १ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन धनुषनंच केलं आहे. धनुषशिवाय या चित्रपटात अभिनेत्री निथ्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, प्रकाश राज, पी. समुथिरकणी आणि राजकिरण हे कलाकार दिसणार आहेत. मूळतः हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. 

धनुषला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार मानले जाते. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढा मोठा सुपरस्टार असूनही हा अभिनेता त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. धनुषने बॉलिवूडमध्येही हात आजमावलेला आहे. आनंद एल राय यांचा 'अतरंगी रे' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. याआधी तो 'शमिताभ' आणि 'रांझना' सारख्या चित्रपटातही दिसला होता. तर 'इडली कडई' शिवाय धनुष 'तेरे इश्क में' चित्रपटातही दिसणार आहे. या सिनेमात धनुषसोबत क्रिती सनॉन (kriti sanon) हिने स्क्रीन शेअर केली आहे. आनंद एल.राय दिग्दर्शित हा सिनेमा २८ नोव्हेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :धनुषTollywoodसेलिब्रिटी