Join us  

ओळखलंत का चिमुरड्याला? हा मुलगा आहे सुपरस्टार, बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत त्याच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 8:09 AM

Guess The Celebrity: फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर फिदा आहेत...

आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो चाहते आनंदाने पाहतात. म्हणूनच रोज असे नवे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे टॉलिवूडच्या एका लोकप्रिय सुपरस्टारचा.  फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना  क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर फिदा आहेत. लवकरच त्याचा डेब्यू बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अद्यापही तुम्ही त्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. 

फोटोतील हा चिमुकला दुसरा तिसरा कुणी नसून साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत विजयसोबत त्याचा धाकटा भाऊ आनंदही दिसतोय. दोघांचा बालपणीचा हा फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

विजय देवरकोंडा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. फक्त टॉलिवूडचं नाही तर बॉलिवूडमध्येही त्याचे लाखो चाहते आहेत.  ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने विजयला टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही ओळख मिळवून दिली. विजय करण जोहरच्या ‘लाइगर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. विजयचा 'कुशी' चित्रपटात काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. यातील  सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.  

टॅग्स :विजय देवरकोंडा