Join us  

ओळखा पाहू? एकेकाळी घर भाडे भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 6:17 PM

विजयचा लहानपणीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका सुपरस्टार हिरोचा आहे.  हा फोटो पाहून या अभिनेत्याची ओळख पटवणं तसं अवघड आहे. त्यामुळे हा कलाकार नेमका कोण हे शोधण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत.

आपल्या अभिनयनाने आणि लुक्समुळे तो तरुणींच्या गळ्यातल्या ताईत बनला आहे. तो अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा. विजयचा लहानपणीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

विजय देवरकोंडाने 2011 मध्ये नुव्विला या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, सुरुवातीला विजय देवरकोंडा  चित्रपटांपेक्षा खाजगी आयुष्यामुळे अफेअर्समुळे चर्चेत राहिला. सध्या तो 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. विजय आणि रश्मिकाने अद्याप नात्याबद्दल अधिककृत खुलासा केलेला नाही. मात्र त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम हे काही जगापासून लपून राहिलेलं नाही.

एक काळ असा होता की विजय देवरकोंडाला चित्रपटात राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांच्याकडे भाडे भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे वडीलही दिग्दर्शक किंवा निर्माता असते तर बरे झाले असते. पण, त्याने परिस्थितीपुढे कधीही हार मानली नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तो आज एक यशस्वी सुपरस्टार आहे. 

‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याची हिल एंटरटेनमेंट नावाची प्रोडक्शन कंपनीही आहे. याशिवाय त्याचा राउडी वेअर नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. सध्या तो 'खुशी'  या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या  चित्रपटात विजय आणि समंथा यांची जबरदस्त केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळाली.

टॅग्स :विजय देवरकोंडासिनेमा