Join us

'आवेशम' फेम फहाद फाजिलला गंभीर आजार, डॉक्टर म्हणाले वयाच्या 41व्या वर्षी इलाजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:24 AM

'आवेशम' नंतर फहाद फाजिल 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनसमोर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता फहाद फाजिल (Fahadh Faasil) सध्या त्याच्या 'आवेशम' सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. यात तो लोकल गुंडाच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय काही महिन्यात तो 'पुष्पा 2' मध्येही दिसणार आहे. 'पुष्पा' मध्ये फहादने पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती. 'पुष्पा 2'मध्ये तो अल्लू अर्जुनचं जगणं मुश्कील करणार आहे. दोघांमध्ये जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे. दरम्यान फहाद फाजिलला गंभीर आजाराचं निदान झालं आहे. नुकतंच एका इव्हेंटमध्ये त्याने याचा खुलासा केला.

एका दिव्यांगांच्या शाळेत आयोजित इव्हेंटमध्ये फहाद फाजिलने त्याच्या आजाराचा खुलासा केला. त्याला ADHD म्हणजे अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिऑर्डरचं निदान झालं आहे. ही न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे जी जास्त करुन लहान मुलांमध्ये आढळते. तर काही केसेसमध्ये मोठ्यांनाही याचं निदान होतं. फहान फाजिलला वयाच्या 41 व्या वर्षी याचं निदान झालं. त्याने डॉक्टरांना विचारलं असता ते म्हणाले की जर लहानपणीच याचं निदान आणि इलाज झाला तर हे ठीक होऊ शकतं."

या वयात फहाद फाजिलला ADHD झाल्याने त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. फदाह शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाला, "जर तुम्ही मला बघून हसत आहात तर हीच ती एकमेव गोष्ट आहे जी मी तुमच्यासाठी करु शकतो."

फहाद फाजिलचा ११ एप्रिल रोजी 'आवेशम' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. १०० कोटींच्या वर सिनेमाने कमाई केली. आता त्याच्या आगामी 'पुष्पा 2' ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीपुष्पा