अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2: The Rule) लवकरच रिलीज होत आहे. सिनेमात अल्लू अर्जुन पुन्हा त्याच हटके स्टाईलमध्ये दिसणार आहे. तर त्याच्या जोडीला 'श्रीवल्ली' म्हणजेच रश्मिका मंदाना आहेच. सध्या दोघंही सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. सिनेमात अल्लू अर्जुनची टक्कर फहाद फासिलशी (Fahadh Faasil) झाली आहे. अल्लू अर्जुनच्या तोडीस तोड काम फहादनेही केलं आहे त्यामुळे त्याचीही लोकप्रियता जास्त आहे. दरम्यान प्रमोशन कार्यक्रमांमध्ये फहाद फासिलच्या अनुपस्थितीवर अल्लू अर्जुनने भाष्य केलं आहे.
'पुष्पा २' चे कलाकार काल कोच्चि येथे पोहोचले होते. मल्याळी प्रेक्षकांसाठी तिथे हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. सिनेमाच्या रिलीजला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. कोच्चि येथील इव्हेंटमध्ये रश्मिका पिवळ्या साडीत सुंदर दिसत होती. तर अल्लू अर्जुनही त्याच्या डॅशिंग अवतारात आला होता. पण सिनेमाचा मुख्य खलनायक फहाद फासिल इथेही अनुपस्थित होता. फहादसोबत काम करण्याबाबत अल्लू अर्जुन म्हणाला, "फहाद इथे असता तर खरोखरंच आठवणीत राहणारा दिवस ठरला असता. फाफाने सिनेमात कमाल काम केलं आहे. माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा मी उत्कृष्ट मल्याळम अभिनेता फाफासोबत काम केलं. आज त्याला बघून मला खरंच गर्व वाटतो. आज इथे केरळमध्ये आम्ही दोघं सोबत असतो तर बरं झालं असतं."
या इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुनने रश्मिकाचीही स्तुती केली. रश्मिका आपल्या अभिनयातून पुन्हा एकदा संपूर्ण देशवासियांचं मन जिंकेल. 'माझी श्रीवल्ली' नॅशनल क्रश आहे. ती माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यच बनली आहे. तिच्यासोबत काम करायला खूप मजा येते. तुझ्याशिवाय 'पुष्पा' बनणं अशक्य होतं."
'पुष्पा २: द रुल' ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सर्वच चाहते सिनेमासाठी खूप उत्सुक आहेत.