मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध संगीतकार के जी जयन यांचे मंगळवारी त्रिपुनिथुरा येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. के जी जयन हे कर्नाटकचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक होते. त्यांनी मंगळवारी सकाळी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील त्रिपुनिथुरा येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा मनोजने खुलासा केला की, त्याचे वडील खूप दिवसांपासून आजारी होते.
के जी जयन यांनी 'जयविजय' नावाने स्वतःची संगीत कंपनी सुरु केली. केजी जयन आणि त्यांचा जुळा भाऊ केजी विजयन यांनी प्रचंड मेहनतीने 'जयविजय' ला एक ब्रँड बनवले. त्यांनी आपल्या संगीतातून लोकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक प्रेम आणि भक्तीगीतांना संगीत दिलं. त्यांच्या संगीताचा प्रभाव संपूर्ण केरळ राज्यामध्ये दिसून येतो.
भगवान अयप्पा यांच्या भजनाने त्यांनी त्यांच्या संगीत कारकीर्दीला सुरुवात केली. जयनने आपल्या भावाच्या (केजी विजयन) मृत्यूनंतरही 'जयविजय' कंपनीच्या माध्यमातून संगीतविश्वात स्वतःची चांगली छाप पाडली. आजही केजी जयन यांनी स्वरबद्ध केलेली गाणी लोकं आवडीने ऐकतात. कर्नाटक संगीतविश्वातील एक तारा निखळला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.