भारतीय मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते मेघनाथन यांचं निधन झालंय. वयाच्या ६० व्या वर्षी मेघनाथन यांनी अखेरचा श्वास घेतलाय. श्वसनाच्या त्रासामुळे मेघनाथन यांना कोझिकोड येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अखेर २१ नोव्हेंबरला सकाळी मेघनाथन यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे २ वाजता मेघनाथन यांची प्राणज्योत मालवली. मेघनाथन यांच्या निधनामुळे कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केलीय.
मेघनाथन यांच्या खलनायकी भूमिका गाजल्या
मेघनाथन यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांना तब्बल ५० हून अधिक मालिकांमध्ये अभिनय केला. १९८० साली मेघनाथन यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुरुवातीला स्टूडिओ बॉय म्हणून मेघनाथन यांनी करिअरला सुरुवात केली. त्यांनी 'उत्तमन', 'राजधानी', 'लक्ष्मी और आई', 'पंचाग्नि', 'उल्लासपुंकट', 'उदयनपालकन' अशा सिनेमांमध्ये काम केलं. या सिनेमातील त्यांच्या भूमिकांचं चांगलंच कौतुक झालं.
मेघनाथन यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी
मेघनाथन मुळचे त्रिवेंद्रमचे होते. त्यांच्या परिवारात त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. चेन्नईमधील एका संस्थानात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर कोईंबतून येथे जाऊन त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनीयरींगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला होता. मेघनाथन यांना पार्वती ही मुलगी आहे. १९८३ पासून आजवर त्यांनी विविध मल्याळम सिनेमांमध्ये अभिनय केलाय. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या.