Join us

विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या विजय थलपतीला चाहत्यांनी घेरलं, गर्दीतून चप्पल फेकून मारली अन्...; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 5:38 PM

विजयकांत यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या थलपती विजयवर चप्पलफेक, व्हिडिओ व्हायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयकांत यांचं गुरुवारी(२८ डिसेंबर) करोनाने निधन झालं. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आज विजयकांत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विजयकांत यांच्या अंत्यसंस्कारासाठी तमिळ अभिनेता थलपती विजयदेखील उपस्थित होता. परंतु, विजयकांत यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या थलपती विजयबरोबर चाहत्यांकडून गैरप्रकार करण्यात आला. 

विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. अशातच थलपती विजयला त्याच्या चाहत्यांनी घेरलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या थलपती विजयला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. यातून स्वत:ला सावरत बाहेर पडत असताना विजयवर गर्दीतून चप्पल फेकून मारण्यात आल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. थलपती विजयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

डीएमडीके पक्षाचे प्रमुख आणि साऊथ सुपरस्टार विजयकांत यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. १४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी