Join us  

"..तर आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू!"; चाहते 'पुष्पा २' च्या मेकर्सवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 8:59 AM

'पुष्पा २' ची उत्सुकता सध्या शिगेला आहे. अशातच चाहत्यांनी मात्र 'पुष्पा २' च्या मेकर्सना कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे (pushpa 2, allu arjun)

'पुष्पा २' हा गेल्या काही महिन्यांपासून बहुचर्चित सिनेमा म्हणून ओळखला जातोय. अल्लू अर्जुन-फहाद फाजिल-रश्मिका मंदाना या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा मोस्ट अवेटेड सिनेमांच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे. काहीच दिवसांपुर्वी 'पुष्पा २' ची रिलीज डेट जाहीर झाली. १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणारा सिनेमा थेट डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलला गेला. त्यामुळे चाहते मात्र भडकले असून त्यांनी 'पुष्पा २'च्या मेकर्सना कोर्टात खेचण्याची भाषा केली.

चाहते 'पुष्पा २' च्या मेकर्सवर भडकले कारण...

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त 'पुष्पा २' ट्रेंड करत आहे. ब्लॉकबस्टर पुष्पाच्या सिक्वेलची चाहत्यांनी अनेक दिवसांपासून वाट पाहिली होती. अशा परिस्थितीत काही दिवसांपुर्वी पुष्पाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली गेल्याने चाहत्यांना त्यांचा राग आवरता आला नाही. एका यूजरने लिहिले - 'पुष्पा २ आधी ऑगस्टमध्ये रिलीज होत होता, मग आता डिसेंबरमध्ये का रिलीज होत आहे? निर्मात्यांनी काय मस्करी लावलीय? लोकांच्या भावनांशी खेळत आहात. पुष्पा २ लवकरात लवकर रिलीज व्हावा म्हणून मी 'पुष्पा'च्या चाहत्यांच्या वतीने न्यायालयात खटला दाखल करणार आहे.'

तर दुसरा चाहता लिहितो- 'रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. हे किती वेळा करणार. याला काही मर्यादा आहे का?' तिसऱ्या चाहत्याने पोस्ट केले- 'पुष्पा २ च्या रिलीजची आम्ही किती दिवसांपासून वाट पाहत आहोत याची तुम्हाला कल्पना आहे का? हा सिनेमा आमच्यासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही रिलीजचे दिवस मोजत आहोत. पुष्पा 2 लवकरच रिलीज करा.'

या तारखेला 'पुष्पा २' होणार रिलीज

 १७ जूनला रात्री 'पुष्पा २' च्या मेकर्सनी नवीन पोस्टर शेअर करत सिनेमाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केलीय. 'पुष्पा २' सिनेमाच्या नवीन पोस्टरमध्ये अल्लूने कोट परिधान केला असून डोक्यावर शेला गुंडाळला आहे. हातात तलवार असलेल्या खतरनाक अवतारात अल्लू अर्जुन दिसतोय. या पोस्टरवर 'पुष्पा २' ची रिलीज डेटही झळकत आहे. ६ डिसेंबर २०२४ ला 'पुष्पा २' भारतभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना