Join us

Video : प्रभासला भेटण्याच्या आनंदात चाहतीने अभिनेत्याच्या गालावरच मारली चापट, पुढे त्याने काय केलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 11:53 IST

आपला आवडता कलाकार समोर आला की अनेकदा चाहते भान विसरतात. त्यांना काय करावं ते समजत नाही. असाच काहीसा प्रकार प्रभासबरोबरदेखील घडला. 

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्याच्या आगामी 'सालार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'बाहुबली' चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रभासचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठीही चाहते आतुर असतात. आपला आवडता कलाकार समोर आला की अनेकदा चाहते भान विसरतात. त्यांना काय करावं ते समजत नाही. असाच काहीसा प्रकार प्रभासबरोबरदेखील घडला. 

प्रभासचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एअरपोर्टवर प्रभासला बघताच त्याच्या चाहतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. चाहतीचा सेल्फी काढण्याचा हट्टही प्रभासने पूर्ण केला. पण, चाहतीने आनंदाच्या आणि भावनेच्या भरात असं काही केलं की प्रभासही पाहतच राहिला. सेल्फी काढून झाल्यानंतर चाहतीने प्रभासच्या गालावरच चापट मारली. 

एका फॅन पेजवरुन प्रभासचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचं म्हटलं जात आहे. पण, चाहतीच्या या कृत्याने प्रभासच्या चेहऱ्यावरचे रंग उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, प्रभासचा 'सालार' चित्रपट येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर श्रृती हसन, मिनाक्षी चौधरी, पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही प्रमुख भूमिकेत असणार आहेत. 

टॅग्स :प्रभाससेलिब्रिटी