'चंद्रयान 3' च्या यशस्वी मोहीमेनंतर पंतप्रधान मोदींनी काल 'गगनयान मिशन'ची घोषणा केली. ISRO च्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 'गगनयान मिशन'च्या माध्यमातून भारतीय अंतराळवीर अंतराळात झेप घेणार आहेत. २७ फेब्रुवारीला नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीत 'गगनयान उडान मिशन' मध्ये सहभागी होणाऱ्या ४ अंतराळवीरांचा सन्मान केला. या चार अंतराळवीरांपैकी पायलट प्रशांत बालकृष्णनन नायर यांची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे, पायलट नायर यांच्या पत्नीने काल त्यांच्या लग्नाचा खुलासाही केला.
एअर फोर्सचे फायटर पायलट प्रशांत बालकृष्णनन नायर यांच्या पत्नीचं नाव लीना कुमार. लीना ही सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आहे. पंतप्रधान मोदींकडून पती नायर यांचा सन्मान झाल्यावर लीना कुमार यांनी त्यांच्या लग्नाचा मोठा खुलासा केला. लीनाने इन्स्ट्राग्राम हॅंडलवर व्हिडीओ शेअर केला. यात त्यांच्यासोबत पायलट नायर दिसत आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लीनाने खुलासा केला की, १७ जानेवारी २०२४ ला आमचं लग्न झालंय.
कालच्या खास दिवशी लीनाने पायलट नायरसोबत लग्नाचा खुलासा करत खास पोस्ट लिहीली. ४० दिवस त्यांनी लग्न केल्याचं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. काल पंतप्रधान मोदींनी जेव्हा गगनयान मोहीमेसाठी सज्ज असलेल्या पायलट नायर यांचा सन्मान केला. तेव्हा त्या खास दिवसाचं औचित्य साधून लीनाने त्यांच्या लग्नाचा खुलासा केला. त्यामुळे सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं.