Game Changer OTT Release: सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा 'गेम चेंजर' (Game Changer) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक राजकीय अॅक्शन ड्रामा आहे. 'गेम चेंजर'ला चित्रपट समीक्षकांकडून मिश्रित प्रतिक्रिया मिळाल्या. राम चरणच्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 'गेम चेंजर' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, हे जाणून घेऊया.
'गेम चेंजर' हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा चित्रपट आहे. सिनेमाचे बजेट सुमारे ४५० कोटी आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची गाणी तयार करण्यासाठी 75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला तब्बल तीन वर्षे लागली. 'गेम चेंजर' या चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये तो वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिकांमध्ये दिसणार आहे. चित्रपटाची कथा राम नंदन नावाच्या एका आयएएस अधिकाऱ्याभोवती फिरते, जो देशातील भ्रष्ट नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो. डिजिटल हक्क आधीच विकले गेले आहेत. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होईल.
राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त, अंजली, एसजे सूर्या, सुनील, जयराम, श्रीकांत, समुथिरकानी आणि नास्सर यांसारखे कलाकार देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. चित्रपटाची कथा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली आहे आणि त्याचे संवाद साई माधव बुर्रा यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे.