Join us

'गेम चेंजर' बॉक्स ऑफिसवर करणार धमाका, राम चरण-कियारा आडवाणीच्या पॉलिटिकल ड्रामाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:32 IST

Game Changer Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या आगामी 'गेम चेंजर' या पॉलिटिकल ड्रामाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या आगामी 'गेम चेंजर' (Game Changer Movie) या पॉलिटिकल ड्रामाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून कियारा आडवाणी साउथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे.

२ मिनिट ४० सेकंदाचा गेम चेंजर सिनेमाचा ट्रेलर राम चरणने सुरू होतो जो एक आयएएस अधिकारी आहे आणि लोकांना त्यांच्या पैशाचा लोभी होऊ नये असे सांगतो. त्यानंतर तो एक विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी आणि नंतर लुंगी घातलेल्या अनेक लूकमध्ये दाखवण्यात आला आहे. 'गेम चेंजर' या चित्रपटात राम चरण डबल रोलमध्ये आहे, त्याने स्वत: त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे जो एक नेता होता. अंजली त्याच्या आईची भूमिका साकारत आहे. एसजे सूर्या भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून प्रवेश करत रामचरणच्या विरोधात उभे असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

नवीन पोस्टरसह जाहीर केली ट्रेलरची रिलीज डेटनिर्मात्यांनी एक दिवस आधी 'गेम चेंजर'च्या ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर केली होती. X वर पोस्ट करताना, निर्मात्यांनी धोती परिधान केलेल्या राम चरणचा एक नवीन लूक शेअर केला होता. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'गेम चेंजर'ची मोस्ट अवेटेड घोषणा आहे. राजाला त्याच्या सर्व वैभवात पाहण्यासाठी सज्ज व्हा. २.१.२०२५ पासून खेळ सुरू करूयात! १० जानेवारीला 'गेम चेंजर'. ट्रेलर रिलीजची वेळ पोस्टरमध्ये ०५.०४ वाजता लिहिली होती.

'गेम चेंजर'ची स्टारकास्टएस शंकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'गेम चेंजर' चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. राजकारणातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. या चित्रपटात कियारा आडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात एसजे सूर्या, अंजली, श्रीकांत आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.

टॅग्स :कियारा अडवाणीराम चरण तेजा