बॉक्स ऑफिसवर 'हनुमान' या चित्रपटाचा बोलबाला पहायला मिळतोय. साऊथ सुपरस्टार तेजा सज्जाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोज नवनवे रेकॉर्ड तोडत असून कोट्यवधींची कमाई करत आहे. प्रेक्षक आवर्जून चित्रपटगृहात जात हा सिनेमा पाहत आहेत. दरम्यान, आता 'हनुमान'च्या ओटीटी अधिकारांची माहिती समोर आली आहे.
'हनुमान' चित्रपटगृहांनंतर आता OTT प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल याचे अपडेट समोर आले आहे. झी कंपनीने 'हनुमान'चे OTT हक्क विकत घेतले आहेत. याचा अर्थ, चित्रपटगृहांनंतर, OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर हा सिनेमा पाहता येणार आहे. 12 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'हनुमान' सिनेमा OTT वर कधी प्रदर्शित होणार याची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटगृहांनंतर OTT वर या चित्रपटाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल. रिलीजच्या ६० दिवसांनंतर हा चित्रपट ZEE5 वर येऊ शकतो अशी माहिती आहे.
शुक्रवारी 'हनुमान' सिनेमाची अभिनेता महेश बाबूच्या गुंटूर कारम आणि धनुषच्या 'कॅप्टन मिलर' सिनेमाशी जोरदार टक्कर झाली, तरीही तेजा सज्जाच्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. Sacknilk च्या मते, चित्रपटाने पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. जगभरातील चार दिवसांच्या कलेक्शनसह 'हनुमान'ने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. खुद्द तेजा सज्जाने ही माहिती दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे कलेक्शन पोस्टर शेअर करून ही माहिती दिली.