Join us

'पुष्पा २' मध्ये झळकला भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:06 IST

क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याची चर्चा सध्या सगळीकडे होतेय. 

बहुचर्चित 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात 800 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. अल्लू अर्जुनने 'पुष्पराज', रश्मिका मंदान्नानं 'श्रीवल्ली' आणि फहाद फासिलच्या 'भंवर सिंग शेखावत'च्या भुमिकेचं तर कौतुक होत आहेच. पण, सिनेमातील आणखी एक पात्र आहे, ज्याची चर्चा सध्या सगळीकडे होतेय. 

'पुष्पा 2' मध्ये फहाद फासिलनंतर आणखी एका खलनायक 'बुग्गा रेड्डी' ची एन्ट्री होते, जो पुष्पाच्या नाकात दम करतो.  'बुग्गा रेड्डी' हा केंद्रीय मंत्री कोगतम वीरा प्रताप रेड्डी (जगपति बाबू) यांच्या पुतण्या आहे. जो सिनेमात पुष्पाच्या पुतणीचं अपहरण करतो. ही  'बुग्गा रेड्डी'च्या भुमिकेत हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण, असे नसून 'बुग्गा रेड्डी'ची भुमिका दाक्षिणात्य अभिनेता तारक पोनप्पा याने साकारली आहे. 

सोशल मीडियावर विविध मीम व्हायरल होत आहेत. यावर खुद्द तारक पोनप्पाने प्रतिक्रिया दिली आहे. एक मीम इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्याने लिहलं, "क्रुणाल पांड्याला खूप सारं प्रेम".

 

तारक पोनप्पा आणि क्रुणाल पांड्या हे जवळपास सारखे दिसतात. त्यामुळे काही लोकांचा गोंधळ झाल्याचं दिसून येतंय.  दोघांच्या लूकमध्ये इतकं साम्य पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तारक पोनप्पा यानं  'बुग्गा रेड्डी' ही छोटी भूमिका अतिशय सुंदरपणे साकारली आहे. तारक पोनप्पाने यापूर्वी केजीएफ – चॅप्टर २ या चित्रपटात दया नावाची भूमिका साकारली होती.

टॅग्स :सेलिब्रिटीक्रुणाल पांड्याअल्लू अर्जुनसोशल मीडियाहार्दिक पांड्या