Join us

'जेलर' फेम अभिनेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 1:30 PM

वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

रजनीकांतचा 'जेलर' नुकताच रिलीज झाला. बॉक्सऑफिसवर सिनेमाने कमाईचा पाऊसच पाडला. सिनेमाच्या यशानंतर आता तेलुगू इंडस्ट्रीसाठी एक वाईट बातमी आली आहे. 'जेलर'मधील एका कलाकाराचं निधन झालं आहे. जी मारिमुथू (G Marimuthu) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने तेलुगू इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

जी मारिमुथी हे टेलिव्हिजन स्टार होते. त्यांना तमिळ टीव्ही सीरिजमधील एथिर्नीकलच्या भूमिकेतून त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. त्यांनी मणिरत्नम यांच्यासह इतर दिग्दर्शकांसोबत असिस्टंट म्हणून काम केलं आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्वीट केले,'धक्कादायक. प्रसिद्ध तमिळ अभिनेता मारिमुथू यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. नुकतंच त्यांनी आपल्या टीव्ही मालिकेतील डायलॉग्समधून प्रसिद्धी मिळवली होती. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.' आणखी एक ट्वीट करत त्यांनी लिहिले,'ते फक्त ५७ वर्षांचे होते.'

जी मारिमुथू यांचं पार्थिव चेन्नईमधील त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलंय. मारिमुथू यांचा मालिकेतील 'हे इंदम्मा' हा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला होता. 

टॅग्स :सिनेमारजनीकांत