विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:25 PM2023-09-08T18:25:47+5:302023-09-08T18:30:02+5:30
नयनतारामुळे मोडला होता प्रभुदेवाचा १६ वर्षांचा संसार, अफेअरबाबत पत्नीला कळलं अन्...
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा तिच्या ‘जवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नयनताराने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. ‘जवान’मध्ये ती बॉलिवूड किंग शाहरुख खानबरोबर झळकली आहे. या चित्रपटात तिने एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. नयनतारा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनतारा फिल्मी करिअरबरोबरच प्रभूदेवाबरोबर असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होती.
नयनतारा विवाहित असलेल्या प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभूदेवाच्या प्रेमात पडली होती. ते दोघं डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रभूदेवा दिग्दर्शन करत असलेल्या विलू चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत होती. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली होती. प्रभूदेवा तेव्हा विवाहित असून त्यांना तीन मुलंही होती. प्रभूदेवा यांच्या मोठ्या मुलाचं २००८ साली कॅन्सरने निधन झालं. मुलाच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी प्रभूदेवा नयनताराला भेटायला गेले होते, असं त्यांची पत्नी लता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा
प्रभूदेवा यांच्या पत्नीने नयनतारावर अनेक गंभीर आरोप केले होते. नयनताराचा फोन येताच प्रभूदेवा घरातून निघून जायचे, असंही त्या म्हणाल्या होत्या. याबरोबरच पतीला माझ्यापासून दूर करत संसार मोडल्याने नयनतारावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. नयनताराबरोबरच्या रिलेशनशिपमुळे प्रभूदेवा यांचा १६ वर्षांचा सुखी संसार मोडला होता. २०१० साली दिलेल्या एका मुलाखतीत प्रभूदेवा यांनी नयनताराबरोबरच्या अफेरच्या चर्चांना दुजोरा देत दोन वर्षांपासून डेटिंग करत असल्याचा खुलासा केला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी नयनताराबरोबर लग्न करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. पण, त्यांचं हे नात फार काळ टिकलं नाही आणि त्यांच्यात ब्रेकअप झालं.
दारू पाजून प्रसिद्ध अभिनेत्याचा दोन महिलांवर बलात्कार, कोर्टाने सुनावली ३० वर्षांची शिक्षा
दरम्यान, नयनताराने २०२२ साली दिग्दर्शक विघ्नेश शिवनबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर सरोगसीच्या मदतीने ते दोघे जुळ्या मुलांचे आईबाबा झाले.