Join us  

थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार 'देवरा'चित्रपट; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 5:40 PM

तुम्ही लवकरच  घरबसल्या कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचा 'देवरा' (Devara Movie) चित्रपट सध्या चर्चेत आहे.  २७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घातलतोय.  हा चित्रपट आता ओटीटीवर कधी स्ट्रीम होईल, याची अनेकजण वाट पाहत आहेत. 

'देवरा' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. तुम्ही लवकरच  घरबसल्या कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. Sacnilk रिपोर्टनुसार, चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये एकूण 248.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात 370 कोटी रुपये कमावले आहेत.  

'देवरा' सिनेमात सैफ आणि ज्युनिअर एटीआर यांच्यातील फेस ऑफचे दृष्य आणि इतर बरेच सीन्स अंगावर काटा आणणारे आहेत. तसंच जान्हवी कपूर, प्रकाश राज आणि मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेचीही झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत आहे. हा  सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरजान्हवी कपूरनेटफ्लिक्स