Join us  

'देवरा'साठी ज्युनिअर एनटीआरने घेतलं तगडं मानधन, जान्हवी आणि सैफला मिळाले फक्त इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 6:40 PM

Devra Movie : साऊथचे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर सध्या त्यांच्या आगामी 'देवरा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जो उद्या म्हणजेच २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

साऊथचे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या त्यांच्या आगामी 'देवरा' (Devara Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जो उद्या म्हणजेच २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ज्युनिअर एनटीआरने आरआरआर चित्रपटापेक्षा जास्त मानधन घेतले असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊयात, ज्युनिअर एनटीआर सोबत सैफ अली खान आणि जान्हवी कपूरने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले. 

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर देवरा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो या सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'देवरा'साठी 'दुनियार एनटीआर'ने ६० कोटींची मोठी रक्कम घेतली आहे. जे त्याच्या 'RRR' चित्रपटापेक्षा जास्त आहे. तो 'देवरा'मध्ये दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

अभिनेता सैफ अली खान सध्या चित्रपटांमध्ये हिरोऐवजी खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातही सैफ भैरवच्या भूमिकेत एनटीआरसोबत भांडताना दिसणार आहे. सैफ अली खानला हा चित्रपट 'ओंकारा'मुळे मिळाला. हे पाहून दिग्दर्शक कोरटाला सिवा यांनी 'देवरा'साठी त्याची निवड केली. वृत्तानुसार, या चित्रपटासाठी सैफ अली खानला १० कोटी रुपये इतकी मोठी फी देण्यात आली आहे. यापूर्वी हा अभिनेता 'आदिपुरुष'मध्ये रावणाची भूमिका साकारताना दिसला होता. 

अभिनेत्री जान्हवी कपूर 'देवरा'मध्ये पहिल्यांदा ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यासोबतच जान्हवी कपूरचे हे साऊथ डेब्यूही होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेत्रीला ५ कोटी रुपये मानधन दिले आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरज्युनिअर एनटीआरसैफ अली खान