ज्योतिका ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे. ज्योतिकानं तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. वयाच्या २८ व्या वर्षी तिने अभिनेता सूर्यासोबत लग्न केलं होत आणि आजही दोघांचा सुखााच संसार सुरू आहे. सूर्या आणि ज्योतिका या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच या लोकप्रिय जोडीनं देवदर्शन केलं आहे.
ज्योतिका आणि सूर्यानं कामाख्या देवी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. या भेटीचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "नवीन वर्षात कोल्हापूर महालक्ष्मी आणि कामाख्याच्या पवित्र शक्तीपीठांना भेट दिल्यानं आनंद झाला. माझ्या पुढच्या चित्रपटाची सुरुवात... तुमचं प्रेम आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच आभारी आहे". या जोडप्याचे हे कोल्हापूर मंदीरातील फोटो पाहून मराठी चाहत्यांना आनंद झाला आहे.
ज्योतिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच दिग्गज अभिनेत्री शबाना आझमीसोबत ओटीटी वेब सिरीज 'डब्बा कार्टेल'मध्ये दिसली होती. २०२४ मध्ये अजय देवगणच्या "शैतान" चित्रपटामध्ये ती झळकली होती. तर सुर्याचा काही महिन्यांपुर्वी 'कंगुवा' चित्रपट प्रदर्शित झाला होता. सूर्याचा हा पॅन इंडिया चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. सुर्याचा चांगला अभिनयही कंगुवा चित्रपटाला वाचवू शकलेला नाही. यासोबतच, सूर्या 'रोलेक्स' आणि 'इरुम्बु काई मायावी' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे, असे एका हिंदी वेब स्टोरीजनुसार. सूर्याची एक नवीन फिल्म 'लव लाफ्टर वॉर' (Surya 44) देखील आहे, ज्याचे दिग्दर्शन कार्तिक सुब्बाराज करत आहे