Join us  

"कल्कि २८९८ एडी" सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, कधी? कुठे? बघता येईल जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 2:44 PM

''कल्कि २८९८ एडी'' लवकरच ओटीटीवर रिलीज व्हायला सज्ज झालाय.

सध्या चित्रपटगृहांमध्ये एका सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा म्हणजे ''कल्कि २८९८ एडी'' .   हा सिनेमा २७ जूनला जगभरात रिलीज झालाय. सुपरस्टार प्रभासचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय.  हा साय-फाय सिनेमा बघायला हाऊसफुल्ल गर्दी होतेय. अशातच ''कल्कि २८९८ एडी'' आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचताय. ''कल्कि २८९८ एडी'' लवकरच ओटीटीवर रिलीज व्हायला सज्ज झालाय.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा  Amazon Prime आणि Netflix वर स्ट्रीम होणार आहे. Amazon Prime हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह  प्रदर्शित होईल. तर Netflix वर  हिंदी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह पाहायला मिळेल.  सुरुवातील जुलैच्या अखेरीस सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण, आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो.

 ''कल्कि २८९८ एडी''  सिनेमात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांच्या  प्रमुख भूमिका आहेत. आधुनिक कथेला पौराणितेची जोड दिल्याने हा सिनेमा लोकांना आवडतोय. सिनेमात महाभारताचा सुरेख संबंध जोडण्यात आलाय. 'अश्वत्थामा' आणि 'श्रीकृष्ण' यांच्यातला भन्नाट संवाद सिनेमात पाहायला मिळतो. पहिल्याच दिवसापासूनच हा सिनेमा कमाईचे विविध आकडे तोडत आहे.

टॅग्स :प्रभाससेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमादीपिका पादुकोणनेटफ्लिक्स