Kanguva Star Cast Fee: साऊथ सुपरस्टार अभिनेता सूर्याचा बहुप्रतिक्षित 'कंगुवा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सूर्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असून यात अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुर्यासोबतच कंगुवामध्ये बॉबी देओलचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळतो. तर दिशा पाटनीने पुन्हा एकदा सर्वांना भूरळ घातली आहे. या चित्रपटासाठी स्टारकास्टने किती रक्कम घेतली आहे जाणून घेऊया.
'कंगुवा' च्या कास्टमध्ये सगळ्यात जास्त मानधन हे सूर्यानं घेतल्याचं म्हटलं जात आहे. तर इतर कलाकारांनाही सिनेमासाठी तगडं मानधन आकारलं आहे. सुर्याने या चित्रपटासाठी ३९ कोटीची रक्कम घेतली आहे. तर सुर्याच्या तुलनेत बॉबी देओलनला खूपच कमी मानधन मिळालं आहे. त्याला फक्त 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर दिशा पटानीला या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये मानधन देण्यात आलं आहे.
'पुनर्जन्म', 'विश्वासघात', 'सम्मान' यावर 'कंगुवा' सिनेमाची कथा आधारित आहे. आधुनिक युग आणि प्राचीन युग अशा दोन टाईमलाईनवर सिनेमा आहे. 'कंगुवा' या वर्षातील सर्वात बिग बजेट सिनेमांपैकी एक आहे. ३५० कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा तयार झाला आहे. सिनेमाचं शूट भारताशिवाय ७ वेगवेगळ्या देशात झालं आहे. हा सिनेमा पाहायला प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. बजेटच्या तुलनेत सिनेमा मोठी कमाई करताना दिसतोय.