अबूधाबी येथे नुकताच आयफा पुरस्कार २०२४(IIFA 2024) पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य इंडस्ट्रीतीलही काही कलाकार आले होते. दरम्यान कन्नड फिल्ममेकर हेमंत राव यांनी पुरस्कार न मिळाल्याने राग व्यक्त केला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने लांबलचक कॅप्शन लिहित आयफावर निशाणार साधला.
काल झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील काही कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी सम्मानित करण्यात आलं. यावेळी 'कातेरा' चे दिग्दर्शक थारुन सुधीर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. यामुळे कन्नड दिग्दर्शक हेमंत राव (Hemanth Rao) यांनी खंत व्यक्त केली.
हेमंत राव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "आयफाचा संपूर्ण हा अनुभव हा असुविधा आणि खूपच अपमानजनक होता. मी गेल्या एका दशकापासून या इंडस्ट्रीत आहे. हा पुरस्कार सोहळा माझा काही पहिला अनुभव नव्हता. नेहमीच असं चालत आलं आहे की विजेत्यांना इव्हेंटसाठी विमानाने घेऊन जाण्यात येतं. उदाहरणार्थ मी पहाटे ३ वाजेपर्यंत बसून होतो आणि मला समजलं की आपल्याला अवॉर्डच नाहीए. संगीतकार चरण राज यांच्यासोबतही हेच झालं."
ते पुढे लिहितात, " हा तुमचा सोहळा आहे. तुम्हाला हवं त्याला तुम्ही पुरस्कार द्याल. ती तुमची निवड आहे. मला बरेच पुरस्कार मिळालेले नाहीत आणि त्यावरुन माझी झोपही उडालेली नाही. त्यामुळे हे द्राक्ष इतकेही आंबट नाहीत. जर इतर सर्वच नॉमिनेटेड लोकांना आमंत्रित केलं गेलं असतं आणि त्यांच्यातील एक विजेता असता तर मी इतकं हैराण झालो नसतो. तसंच यावर्षीचा फॉर्मॅट केवळ पुरस्कार देण्याचा होता. नॉमिनींचा उल्लेखही केला गेला नाही. कदाचित तुम्हाला आणि टीमला याची जाणीव होण्यासाठी वेळ लागला आहे. तुम्ही दाखवलेल्या टॅलेंटवर पुरस्कार सोहळा चालतो. पण मला माझं काम जगात भारी आहे हे दाखवण्यासाठी तुमच्या पुरस्काराची गरज नाही. पुढच्या वेळी तुम्हालाच माझी स्टेजवर गरज असेल आणि विश्वास ठेवा तसंच होईल. तुमचा अवॉर्ड घेऊन अंधारात चमकवा. सगळ्यालाच चांदीची कड असते. मी माझ्या टीमला भरपूर अवॉर्ड्स घेताना बघितलं. त्यामुळे सगळाच वेळ वाया गेला असं मी म्हणणार नाही."
यासोबत हेमंत राव यांनी स्पष्ट केलं की सुधीर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना राग आलेला नाही. मी त्यांना आणि टीमला शुभेच्छा देतो. माझा वेळ आणि एनर्जी वाया गेली एवढंच माझं म्हणणं आहे