बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor) हिचा बॉलिवूड इंडस्ट्रीवर दबदबा आहे. तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. करीना कपूर खान साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दक्षिणेतील तिचा पहिला चित्रपट केजीएफ स्टार यश(Yash)चा 'टॉक्सिक' (Toxic Movie) असणार होता. मात्र, आता या चित्रपटातून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.
केजीएफ फेम यश त्याचा आगामी चित्रपट टॉक्सिकमुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटातून करीना कपूर साउथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते. ती या चित्रपटात यशच्या बहिणीची भूमिका साकारणार होती. तर अभिनेत्री कियारा आडवाणी यशच्या प्रेयसीची भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे. मात्र, आता वेगळ्याच बातम्या येत आहेत.
करीना कपूर पडली बाहेर?यशच्या शूटिंगच्या तारखा जुळत नसल्यामुळे करीनाने चित्रपटातून बाहेर पडल्याचे जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, काहीही करून करीना या चित्रपटाचा भाग राहावी यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जात होते, मात्र आता ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत निर्मात्यांना दुसरी अभिनेत्री कास्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी करिनाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू केला आहे. तिची जागा साऊथच्या एका टॉप अभिनेत्रीने घेतल्याची चर्चा आहे.
या अभिनेत्रीची लागली वर्णीशाहरूख खानसोबत जवानमध्ये झळकलेली अभिनेत्री नयनताराची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, गीतू मोहनदास आणि यश यांनी गेल्या काही आठवड्यात नयनताराशी बोलणे केले आहे. 'टॉक्सिक'मध्ये काम करण्यातही तिने रस दाखवला आहे. ती या चित्रपटात यशच्या बहिणीची भूमिका साकारू शकते. गीतू मोहनदास यांनी एका स्त्रीसाठी एवढी सशक्त भूमिका लिहिली आहे आणि ती त्याच्या दृष्टीला चांगली जोडत आहे, याचा नयनताराला आनंद आहे. गीतू मोहनदास आणि यश देखील नयनताराला चित्रपटात कास्ट करण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. सध्या टॉक्सिकचे शूटिंग सुरू असून, हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.